मराठी उखाणे, उखाणे, लग्नातील उखाणे

मराठी उखाणे


उखाणे


लग्नातील उखाणे

"आपल्या दिलातलं प्रेम, सजवलं राहो जीवनाचं क्रम,
प्रत्येक दिवस, हसतं राहो, सुख-संपत्तींचं होईल विस्तार,
आपुलकीचं रहो, एकमेकांसाठी असो, सजवलं जीवनाचं सार.
आपल्या प्रेमातलं भर, त्यातलं रंग, येईल तुमचं जीवन मस्तानं,
सोबत राहण्याचं आनंद, येईल तुमचं सजीवानांतर क्रम."


1) मळ्याच्या मळ्यात मोगरा दाट पिवळ्या शालूला जरीचे काठ------ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.


2) हातात सोडा पायात जोडवी  सौभाग घ्यायची खून----- रावांचे नाव घेते-----ची सून.


3) मंगळसूत्र आणि जोडवी सौभाग्याची खून-------रावांचे नाव घेते --------घराण्याची  सून.


4) अंगणातली तुळस पवित्र्याच स्थान -------रावांमुळे मिळाला सौभाग्याचा मान.


5) कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात------- रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मळ्यात.


6) कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित-------- रावसारखे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित.


7) संक्रांतीला मी सौभाग्य अलंकार आणि नटते-------- रावासोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते.


8) तिळगुळ घेण्यासाठी झाले सगळेजण गोळा------- रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.


9) निरोगी आरोग्यासाठी रोज फळ खावे ताजे------ रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे.


10) उसापासून बनते काकवी आणि गुळ------- रावांचे नाव घेऊन वाटते  मी  तिळगुळ.

11) गणपतीला वाते दुर्वा विठ्ठलाला वाते तुळस------ रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.

12) सूर्याच्या तेजाने उजळला आसमंत सारा सूर्याच्या तेजाने उजळला आसमंत सारा -------राव आहे माझ्यासाठी मौल्यवान हिरा--------राव आहे माझ्यासाठी मौल्यवान हिरा.

13) तिळगुळाच्या देवी घेवी नात्यात वाढते गोडवी ------रावांची आणि माझी अखंड राहो जोडी.

14) पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा------ रावांच्या जीवावर हातात भरला हिरवा चुडा.

15) कमळात उभी लक्ष्मी
       मोरावर सरस्वती -------रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

16) मोगऱ्याचा गजरा
 गुलाबाचा हार 
---------रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार.

17) चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा------- रावांच्या राणीला मोत्याचा चुडा.

18) साडी घालते फॅशनची पदर लावते साधा------ राव माझे कृष्ण मी त्यांची राधा.

19) जेजुरीचा खंडोबा
 तुळजापूरची भवानी
-------- रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी.

20) सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी-------रावांचं नाव घेते सर्व आहे साक्षी.

21) गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं ------रावांचं नाव माझ्या मनात कोरल.

22) कानातल्या झुमक्याला मोती लावले 100------ राव आहेत लाखात एक नंबर.

23) जाई जुईच्या बागेत काचेचा बंगला ------रावांच्या संसारात जीव माझा रमला.

24) शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने------- रावांचे नाव घेते प्रेम भावभक्तीने.

25) देवघरात ठेवतो नंदादीप समाधानाचा------- रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा.

26) महादेवाच्या डोईवर चंद्राची कोर ------ रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर.

27) देवादेवी करते मी तुझी भक्ती -------रावांसोबत राहू दे तुझ्या आशीर्वादाची शक्ती.

28) पार्वतीने नवस केला पती मिळावा भोलेनाथ ------ रावांची मिळो मला जन्मोजन्मी साथ.

29)  द्वारकेत श्रीकृष्ण अयोध्येत राम------- रावांच्या सेवेमध्ये मिळतील मला चारीधाम.

30) चंद्रभागेच्या तिरी उभा आहे विठू सावळा----- रावांचं नाव घेते----- राव तर माझे छत्रपती चा मावळा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाणे, उखाणे, लग्नातील उखाणे

"मसालेदार आनंद: अप्रतिम अंडा भुर्जी एक्स्ट्रावागांझा!"

"घरी स्वादिष्ट तंदूरी मोमोज कसे बनवायचे"